सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (13:17 IST)

दुधी भोपळ्याचे चविष्ट धिरडे

सकाळच्या न्याहारीसाठी सर्वात सोपे आणि आरोग्यवर्धक पदार्थ धिरडे आहे. हरभरा डाळीचे पिठापासून ते रव्याचे आणि मुगडाळीचे देखील बनवले जाते. एवढेच नव्हे तर बटाट्याचे धिरडे देखील बनविले जाते. पण या वेळी दुधी भोपळ्या पासून बनवलेले धिरडे करून बघा. हे खाल्ल्यावर इतर सर्व धिरड्यांचे स्वाद विसराल. चला तर मग दुधी भोपळ्याचे धिरडे बनविण्याची साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य - 
2 दुधी भोपळे, 2 चमचे रवा, 1/2 कप हरभरा डाळीचे पीठ, मीठ चवीपुरते, तेल, 3 हिरव्या मिरच्या, 2 चमचे ओवा, 1/2 चमचा गरम मसाला,1/2 चमचा तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर.
 
कृती -
सर्वप्रथम दुधी भोपळा किसून घ्या. निघालेल्या पाण्याला गाळून घ्या .या किसलेल्या दुधी भोपळ्यामध्ये रवा,हरभरा डाळीचे पीठ, हिरव्या मिरच्या, मीठ, गरम मसाला, तिखट, ओवा, कोथिंबीर घाला आणि पाणी घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. कारण दोन्ही परिस्थितीत धिरडे बनायला त्रास होईल. आता एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा त्या वर थोडे तेल टाका आणि हे मिश्रण टाकून पसरवून द्या. तांबूस रंग येई पर्यंत हे शेकून घ्या वरून कडेने तेल सोडा आता हे धिरडे पालटून घ्या आणि दोन्ही बाजूने खमंग शेकून घ्या. थोडं तेल सोडा. दोन्ही कडून खरपूस शेकल्यावर  हे बाहेर काढून सॉस किंवा चटणीसह सर्व्ह करा.