बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 जुलै 2024 (15:36 IST)

पावसाळा रेसिपी : चहा सोबत बनवून खा चविष्ट मॅगी सामोसा

samosa
पावसाळा सुरु झाला आहे. व बाहेर छान पाऊस पडत असतांना बालकनीमध्ये बसून चहा घ्यायचा आनंद काही वेगळाच आहे. तसेच अनेकांना चहा सोबत काहीतरी चविष्ट नाश्ता करायला आवडतो. आता नाश्ता मध्ये सामोसा, मॅगी, कटलेट, धिरडे यांसारखे अनेक पदार्थांचा समावेश होतो. पण नेहमी हेच खाऊन कंटाळा आला असेल तर आज ट्राय करू पहा मॅगी सामोसा. तर चला जाणून घेऊ या मॅगी सामोसा रेसिपी 
 
साहित्य
300 ग्रॅम मैदा 
1 कप मॅगी नूडल्स 
1/2 कप ओवा 
तेल आवश्यकतेनुसार 
2 कप पाणी 
1/2 चमचा आले पेस्ट 
1/2 चमचा लसूण 
2 मोठे चमचे हिरवी कोथिंबीर 
1 छोटा चमचा कॉर्न स्टार्च 
2 मोठे चमचे गाजर 
1/4 चमचे कोबी 
2 चमचे बीन्स 
1 चमचा शिमला मिर्ची 
1 छोटा चमचा रेड चिली सॉस 
2 मोठे चमचे सोया सॉस 
 
कृती-
मॅगी सामोसा बनवण्यासाठी सर्वात आधी मॅगी नूडल्स तयार करून घ्यावे म्हणजे वाफवून घ्यावे. यामध्ये सामोसा मध्ये टाकणार आहोत त्या सर्व भाज्या घाला. आत पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आले, लसूण, चिमूटभर मीठ घालावे. आता यामध्ये रेड चिली सॉस, सोया सॉस मिक्स करावा. थोडावेळ परतवून घ्यावे. यानंतर पॅनमध्ये कॉर्नस्टार्च घालून सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता पॅनमध्ये मॅगी नूडल्स घालावे आणि सर्व मिक्स करून तीन चार मिनिट शिजवावे. 
 
आता एका परातीत मैदा, ओवा, मीठ, थोडेसे तेल, पाणी घालून पीठ मळून घ्या. व तीस मिनिट तसेच ठेऊन द्या. मग या पिठाचे गोळे बनवून पुरीचा आकार द्यावा. आता यामध्ये बनवलेली मॅगी भरून सामोसा आकार द्यावा. तसेच एका कढईमध्ये तेल गरम करून छान कलर येईसपर्यंत हे सामोसे तळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले मॅगी सामोसे गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik