बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जुलै 2024 (06:36 IST)

चविष्ट लज्जतदार छोले पनीर, जाणून घ्या रेसीपी

Chhole pnir
साहित्य-
1 कप छोले रात्री भिजवलेले
2 कप पाणी 
1 कढी पत्त्याची काडी  
1 दालचीनी  
2-3 लवंग 
1 छोटा चमचा जिरे 
1 छोटा हळद 
1 छोटा चमचा धणे पूड 
1 छोटा चमचा जिरे पूड 
1 छोटा चमचा गरम मसाला
1 छोटा चमचा लाल तिखट 
2 टोमॅटो बारीक कापलेले 
2 मोठे चमचे तेल 
चवीनुसार मीठ 
200 ग्रॅम पनीर
 
कृती-
पहिले प्रेशर कुकरमध्ये, कढी पत्ता, दालचीनी, लवंग आणि जिरे घालावे. भिजवलेले छोले 2 ते 3 शिट्टी घेऊन शिजवून घ्यावे. 
आता एका पॅनमध्ये तेल गरम करा व यामध्ये जिरे घालावे. तसेच टोमॅटो घालावे.
आता यामध्ये हळद, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला आणि लाल तिखट घालावे. व परतवून घ्यावे. आता छोले पॅनमध्ये टाकावे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून शिजू द्यावे. 
हातात परत पॅनमध्ये तेल घालून जिरे घालावे. व पनीरचे तुकडे टाकून परतवून घ्यावे. हळद, गरम मसाला, तिखट, मीठ घालावे.
आता पनीर छोलेमध्ये घालावे. व वरतून कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपले चविष्ट छोले पनीर, तुम्ही हे पुरीसोबत खाऊ शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik