शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By

थोर तुझे उपकार आई ! थोर तुझे उपकार

थोर तुझे उपकार
आई ! थोर तुझे उपकार ।। ध्रु० ।।
 
वदत विनोदें हांसत सोडी
कोण दुधाची धार ।। १ ।।
 
नीज न आली तर गीत म्हणे
प्रेम जिचें अनिवार ।। २ ।।
 
येई दुखणे तेव्हां मजला
कोण करी उपचार ।। ३ ।।
 
कोण कड़ेवर घेउनि फिरवी
चित्ती लोभ अपार ।। ४ ।।
 
बाळक दुर्बळ होतों तेव्हां
रक्षण केले फार ।। ५ ।।
 
त्वांचि शिकविले वाढविले त्वां
आहे मजवर भार ।। ६ ।।
 
स्मरण तुझ्या या दृढ़ ममतेचें
होंते वारंवार ।। ७ ।।
 
नित्य करावे साह्य तुला मीं
हा माझा अधिकार ।। ८ ।।
 
– भास्कर दामोदर पाळंदे