बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (10:06 IST)

मुंबईत लोकल मध्ये मध्यरात्री तरुणीवर ब्लेडने हल्ला,आरोपी मोकाट

राज्याची राजधानी मुंबई मध्ये धक्का दायक घटना घडली आहे. चर्नीरोड रेल्वे स्थानकावर एका तरुणीवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपीने महिलांच्या डब्यात घुसून या तरुणीवर हल्ला केला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. ही घटना काल रात्री 12 वाजताची आहे. या घटनेमुळे महिला प्रवाशींच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला प्रवाशांच्या डब्ब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून देखील अद्याप आरोपी मोकाट आहे. 
 
मुंबई लोकल मधून मध्यरात्री एक तरुणी प्रवास करत असताना चर्नीरोड रेल्वे स्थानका वर एक तरुण महिलांच्या डब्ब्यात शिरला आणि त्याने या तरुणीवर ब्लेड ने हल्ला केला. या आरोपीने तरुणीच्या गळ्यावर वार केले असून त्यात ती गंभीर जखमी झली आहे. या घटने नंतर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध लावला जात आहे.