रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (10:56 IST)

'सूर नवा ध्यास नवा'ची अक्षया ठरली विजेती

ज्या नवोदित गायक-गायिकाच्या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले, ज्यांच्या निरागस सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली. ज्यांनी विविध शैलींची गाणी अत्यंत सहजतेने सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मन जिंकली. त्या 'सूर नवा ध्यास नवा'च्या गुणी गायकांची अंतिम फेरी नुकतीच मुंबईत रंगली होती. 
 
स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात डोंबिवलीच्या अक्षया अय्यर हिने विजेतेपदावर मोहोर उमटवली. आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने अक्षयाने सर्वांना भारावून टाकले. सुवर्ण कट्यार आणि दोन लाख रुपयांची ती मानकरी ठरली आहे.