शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (21:33 IST)

काय म्हणता, मुंबईच्या रस्त्यावर खड्डे झाले कमी

satara road
मुंबईत मागील वर्षाच्या तुलनेत 3 हजार खड्डे कमी झाल्याचा दाव करण्यात आला आहे. 1 एप्रिल ते 7 जुलै दरम्यान महानगरपालिकेने 7 हजार 211 खड्डे बुजवले आहेत. खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी आणि रस्ते देखभाल करण्यासाठी महानगरपालिकेने पथक आणि कंत्राटदार नेमला आहे. तसेच विविध उपाययोजना केल्या आहेत. मागील वर्षात याच वेळेत महानगरपालिकेने सुमारे 10 हजार 199 खड्डे बुजवले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत खड्ड्यांची संख्या कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरित बुजवण्याचे काम महापालिकेतर्फे केले जाते. खड्ड्याबाबत तक्रारी नोंदवण्यासाठी महापारिकेतर्फे संकेतस्थळ, मोबाईल अॅप, समाज मध्यमं, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. याचा उपयोग खड्डे बुजवण्यासाठी झाला आहे. पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे, ही नेहमीची प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येतात. यंदाही अशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या.