गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा सत्कार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा हा मुहूर्त साधत शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार आयोजित करीत गुरुवारी सायंकाळी 5 वाजता बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर मोठा जल्‍लोष करण्याचा येणार आहे. सेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन शिवसेनाप्रमुखांना दिले ते पूर्ण केल्याबद्दल राज्यभरातील शिवसेनेच्यावतीने हा सत्कार होईल.  त्यानिमित्ताने होणार्‍या जल्‍लोषात शंकर महादेवन, अजय-अतुल आदी गायक, संगीतकारांपासून ते भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आदी विनोदवीरही सहभागी होत आहेत. प्रचंड गर्दी खेचणार्‍या करमणुकीच्या कार्यक्रमातच 11 ज्येष्ठ शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना सन्मानित करतील. 

सायंकाळी सेनेचा हा जल्‍लोष तर त्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सकाळी 9 वाजता गोरेगावच्या नेस्को मैदानावर मनसेचा नवा झेंडा फडकवत महाअधिवेशनाचे उद्घाटन करतील.