शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (11:33 IST)

कोरोनाच्या नियमांची शिवसैनिकांकडून पायमल्ली

सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना पुन्हा उद्रेक करत असताना दिसत आहे. केंद्र सरकारने राज्यात कोरोना प्रसार कमी करण्यासाठी आवश्यक निर्बंध लावण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत राज्य प्रशासन आपलपल्यापरीने राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी निर्बंध लावत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने आपले पाय पसरायला सुरु केल्यामुळे प्रशासनची काळजी वाढत आहे.  राज्य आणि केंद्र सरकार कडून कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगण्यात येत आहे. त्यासाठी काही निर्बंध देखील लावण्यात आले आहे. सध्या राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी सुरु असताना मुंबईत शिवसेनेकडून जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मुंबईच्या अंधेरी परिसरात शिवसेनेकडून मालवणी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून कोरोनाच्या नियमांना पायमल्ली केले गेल्याचे दिसत आहे. या जत्रेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना शिवसैनिकांनी या नियमांना धता देत मालवणी जत्रेचे आयोजन केले. नियम फक्त नागरिकांसाठीच आहे का ? या जत्रेला  परवानगी कुठून मिळाली असा प्रश्न केला जात आहे.