शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (11:46 IST)

महिलांच्या कपड्यात लपवून ठेवलेले ड्रग्स जप्त, NCBची कारवाई

मुंबईच्या धारावीत NCB च्या पथकाने छापे टाकत 3.9 किलोपेक्षा जास्त इफ्रेडीन ड्रग्स जप्त केले आहे. हे ड्रग्स महिलेच्या कपड्यात लपवून ठेवले होते. हे ड्रग्स पुण्यातून आणले गेले होते आणि समुद्र मार्गे आस्ट्रेलियाला पाठविण्याची तयारी होती. महिलांच्या कपड्यात हे ड्रग्स लपविण्यात आले होते. एनसीबीच्या पथकाने अंधेरी पूर्व येथे छापे टाकून अमली पदार्थ जप्त केले आहे.

सध्या एनसीबी अम्लीय पदार्थांच्या विरोधात कारवाई सुरु आहे.  या प्रकरणी गुन्हा दाखल केले असून पुढील तपास करत आहे. या पूर्वी मुंबईच्या एनसीबी ने गोव्यात छापेमारी करत मुंबई आणि गोवाच्या नारकॉटिक्स पथकाने छापेमारी करत दोन महिलांना अटक करत त्यांच्या जवळून 25 किलोचा गांजा पकडण्यात आला आहे. अटक केलेल्या महिलांपैकी एक महिला विदेशी असल्याचे वृत्त आहे. त्यांना कोठडीत पाठवण्यात आले आहे.