शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (08:23 IST)

भीषण अपघातात दांडीच्या चार जणांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बोईसर चिल्हार फाट्याजवळ अवाणढणी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दांडी येथील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य जखमी झाले असून त्यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईकडून दांडी येथे परतताना प्रवासी वाहन ट्रकच्या मागच्या बाजूने धडक दिल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मनोर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
 
एकवीरा मातेचे दर्शन घेऊन हे कुटुंब पालघर तालुक्यातील बोईसर दांडी येथे परतत असताना हा अपघात घडला. वाहनांमध्ये एकूण बारा जण प्रवास करीत होते त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती अतिगंभीर आहे तर सहा जण जखमी आहेत.
अपघातातील मृतामध्ये १) हेमंत तरे (वय -६०), २) सुषमा आरेकर (वय -३२), ३) चालक राकेश तमोरे (वय-४२), ४) सर्वज्ञा आरेकर (वय-०२) या चौघांचा समावेश आहे. तर, तृप्ती तामोरे (वय ३५), रमेश आरेकर (वय ५४) हे यांची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय, 1) हर्षद तरे (वय २७), 2) भव्या आरेकर (वय ४), 3) महेश आरेकर (वय ३९), 4)सुनील तामोरे (वय ४०) 5)आकाश पाटील (वय २५), 6) जयेश तामोरे वय (०३) हे सहाजण जखमी झाले आहेत.