सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (13:33 IST)

Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सवासाठी मुंबई आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले

ganesha
महाराष्ट्रात गणेशोत्सव खूप उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणतेही सण साजरे केले गेले नाही.मागील दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांखाली सण साजरे करण्यात आले होते.मात्र यंदा उत्सवावरील कोरोनाचे निर्बंध हटवल्याने नागरिकांकडून गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुंबईचे आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे .दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

आज गणेशोत्सव समन्वय बैठक मुंबईच्या महानगरपालिका आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडली आणि त्यात आतापर्यंत देण्यात आलेल्या मंडप परवानग्या, गणेशोत्सवासंबंधीच्या परवानग्याची माहिती देण्यात आली.या बैठकीत गणेश विसर्जन मिरवणुकीचे मार्गाचे निर्देश देण्यात आले तसेच मुंबईच्या महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये या उत्सवासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच विसर्जनस्थळी महानगरपालिकेद्वारे वैद्यकीय चाचणी आणि प्रथमोपचार कक्ष करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गाची पाहणी करण्याचे निर्देश आयुक्त्यांनी दिले आहे.विसर्जन स्थळी असणाऱ्या फिरत्या शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांकडून कामगार उपलब्ध देण्यात येणार आहे.

रस्त्यांवर केबल लटकत असल्यास त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकांना बाधा येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत केबल असल्यास त्या तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. भरती - ओहोटीचे वेळापत्रक हे संबंधित विसर्जन स्थळी ठळकपणे लावण्यात येणार असून यंदाचा गणेशोत्सव सर्व नियमांना पाळून साजरा करावा.असे निर्देश देण्यात आले.