सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (08:22 IST)

मुंबईतील कांदिवलीमध्ये गॅस पाइपलाइन फुटली, गॅस गळतीमुळे परिसरात घबराट

kandivali
बुधवारी सायंकाळी उशिरा मुंबईच्या कांदिवली उपनगरात पाईपलाईनमधून गॅस गळती झाल्याने परिसरात राहणारे स्थानिक घाबरले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मात्र, गॅस गळतीमुळे कोणत्याही व्यक्तीला बाधा झाल्याचे वृत्त नाही.
 
बीएमसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली (पश्चिम) येथील कल्पना चावला चौकात सायंकाळी ७.१५ च्या सुमारास गॅस पाइपलाइन फुटली. श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाच्या खोदकामात ही गॅस पाइपलाइन चुकून फुटली.
 
गॅस पाइपलाइन फुटल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच बीएमसी, महानगर गॅस लिमिटेड आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. याशिवाय अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.