गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (08:02 IST)

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास वेगळा विचार करावा लागेल, मुंबई अतिरिक्त आयुक्तांचा सूचक इशारा

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी रेल्वे सेवा मर्यादित वेळेत सुरू करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे प्रवासी संख्या वाढली असून ट्रेनमध्ये आणि प्लॅटफॉर्मला गर्दी दिसू लागली आहे. तसेच, कोरोना रुग्णांची संख्या काहीशी वाढू लागली आहे. याची गंभीर दखल घेत पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, जर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
 
मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. एप्रिल, मे महिन्यात तर धारावी, वरळी आदी विभाग हे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले होते. पालिका आयुक्त पदाची सूत्रे इकबाल चहल यांनी युद्धपातळीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव काही महिन्यात कमी झाला. कोरोना जवळजवळ नियंत्रणात आला. त्यामुळेच राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात सुमारे चारशेच्या आसपास असलेली रुग्णसंख्या ५५८ वर गेली आहे. रुग्णसंख्येत झालेली वाढ हि चिंताजनक वाढ नाही. मात्र अशीच वाढ एमएमआर रिजनमध्ये पुढील दहा ते बारा दिवस होत राहिल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांणी  यांनी सांगितले आहे.
 
पुढील दहा ते १२ दिवस आम्ही अधिक दक्षता घेणार आहोत. तसेच, बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत जी काही वाढ झाली आहे, त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. एमएमआर रिजन म्हणेजच मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भायंदर आणि पनवेल आदी विभागातील पुढील दहा ते बारा दिवसात अशीच वाढ होत राहिल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा सूचक इशारा सुरेश काकाणी यांनी दिला आहे.