बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (08:59 IST)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्वाची बैठकी

shivsena
शिवसेनेच्या वतीने शनिवारी अर्थात आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना भवनात शनिवारी दुपारी १ वाजता ही बैठक पार पडणार असून या बैठकीला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत बंडखोर आमदारांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
बंडखोर आमदारांविरोधात कारवाई तसेच सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचाबाबत कायदेशीर लढाई आदी मुद्द्यांवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंथन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीत वातावरण पाहता बंडखोरांच्या हाती सहजपणे सत्ता न देण्याच्या मानसिकतेत शिवसेना असून याविरोधात संघर्ष करण्याची पूर्ण तयारी शिवसेनेकडून केली जात आहे.