रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (16:32 IST)

अजित पवार काकांच्या मृत्यूची वाट बघणारे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला

jitendra awhad
अजित पवार हे गद्दार आहे. काकांच्या मृत्यूची वाट बघत होते. आपण एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची वाट पाहतो का ? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. 

आव्हाड हे मुंब्रा येथे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना उद्देशून म्हटले की भाजपशी हात मिळवणी करणाऱ्यांना तुम्ही पाठिंबा देणार का? भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या अजित पवारांना तुम्ही साथ देणार का? अजित पवार असे गद्दार आहे जे आपल्या काकांच्या मृत्यूची वाट बघत आहे. 

शरद पवारांनी ज्या अजित पवारांना हात धरून मोठं केलं. त्यानेच त्यांना घराबाहेरच रास्ता दाखवला. हे किती दुःखदायी आहे. ते गद्दार आहे आणि सर्व गद्दार त्यांचे चेले आहे. अशी जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केली. 

आव्हाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मतदार संघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना आव्हाड यांनी अजित पवारांना गद्दार म्हणून संबोधित करत टोला लगावला आहे. 
 
Edited by - Priya Dixit