गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (12:22 IST)

मुंबईत लोकल ट्रेन मध्ये स्टंट करणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला, एक हात आणि एक पाय गमावला

train suicide
मुंबईच्या शिवडी रेल्वे स्थानकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मध्ये एक तरुण लोकल ट्रेनला लोम्बकळून स्टंट करतांना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता तो तरुण रेल्वे पोलिसांना सापडला असून त्याने आपला एक हात आणि एक पाय गमावला आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर रेल्वे पोलिसांनी या तरुणाचा शोध घेण्यास 14 जुलै रोजी तपास करायला सुरु केल्यावर त्याचा शोध लागला हा तरुण मुंबईतील अटॉप हिल येथे राहतो. त्याने हा व्हिडीओ 7 मार्च रोजी सोशल मीडियावर अपलोड केला होता.

पोलिसांनी या अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता. हा वीडियो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या ट्रेनचा होता.

व्हिडीओ समोर आल्यावर पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतल्यावर त्याच्या घरी पोलीस पोहोचले त्याने या स्टंट दरम्यान एक हात आणि एक पाय गमावल्याचे समजले. 
 
Edited By- Priya Dixit