शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (11:15 IST)

नारायण राणेंची बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन करुन होणार जनआशीर्वाद यात्रा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून जनआशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. मुंबईत विमानतळावर पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या यात्रेला सुरुवात होतेय. 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत ही यात्रा होणार आहे.
 
नारायण राणे हे मुंबई शहर, उपनगर, वसई - विरार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत ही यात्रा असेल. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची ही यात्रा महत्वाची मानली जात आहे. नारायण राणे यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिल्याचंही भाजपकडून सांगण्यात येत आहे.
 
आज नारायण राणे हे मुंबई शहरातल्या दादर, सायन, चेंबूर, चुनाभट्टी, गिरगावपासून ते हुतात्मा चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी दौरा करतील. दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
 
20 ऑगस्टला मुंबई उपनगरातल्या शिवसेना प्रभावी असलेल्या भागात ते दौरा करणार आहेत. त्यानंतर एक दिवस वसई- विरार आणि तीन दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा दौरा करतील.