1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (17:50 IST)

मुंबईत 5 तास प्रवासी विमानात अडकले

मुंबईहून एअर मॉरिशसच्या विमानात लहान मुलांपासून ते 78 वर्षांच्या वृद्धापर्यंतचे लोक असताना विमानाचे वातानुकूलन बिघाड झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
 
खराब एअर कंडिशनिंगमुळे प्रवाशांना विमानात एक, दोन नाही तर तब्बल पाच तास बसावे लागले. कल्पनेच्या पलीकडचे हे वास्तव आज मुंबई विमानतळावर घडले. झालं असं की मुंबईहून मॉरिशसला जाणाऱ्या एअर मॉरिशसच्या विमानाच्या एअर कंडिशनिंग सिस्टिममध्ये बिघाड झाला. त्यामुळे लहान मुले आणि 78 वर्षीय वृद्धासह अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. 
 
विमानात चढल्यानंतर काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड झाल्याने प्रवासी पाच तास विमानात अडकून पडले होते.
 
हे विमान आज पहाटे 4:30 वाजता मुंबईहून निघणार होते आणि पहाटे 3:45 वाजता बोर्डिंग सुरू झाले. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने एअर कंडिशनिंगमध्ये बिघाड झाला, त्यामुळे मुंबईहून मॉरिशसला जाणारे विमान रद्द करावे लागले. प्रवासी पाच तास विमानात अडकले होते आणि त्यांना खाली उतरण्याची परवानगी नव्हती.