मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता तीन रुपयांनी महाग
ऐन महागाईत मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. कारण मुंबई महानगर परिसरातील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला राज्य सरकारनं मंजुरी दिलीय. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता तीन रुपयांनी महागणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्य़ामुळे सर्वसामान्यांचा प्रवास देखील महागला आहे.
रिक्षाच्या पहिल्या टप्प्यासाठी आता १८ ऐवजी 21 रूपये मोजावे लागणार आहेत. तर टॅक्सीसाठी 22 ऐवजी 25 रूपये मोजावे लागणार आहेत. सहा वर्षांनंतर ही भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्याकडे कोणतेही वाहन नाही म्हणणाऱ्यांच्या खिशाला देखील चटका लागणार आहे.