1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:08 IST)

धक्कादायक ! रेल्वेत महिलांच्या डब्यात नराधमाचे चक्क ‘अश्लिल’ चाळे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका पुरुषाने भरदिवसा हस्तमैथुन अन् अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर रेल्वे प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मुंबईतील लोकलमधील महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या विकृतावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र व्हिडिओ पाहिल्यावर हा व्हिडिओ सध्याचा असल्याचे समजते.कारण या व्हिडिओमध्ये अनेक महिलांनी चेहऱ्यावर मास्क घातल्याचे पहायला मिळत आहे.
 
व्हिडिओमध्ये एक पुरुष लोकलच्या दारात उभा असून तो हस्तमैथुन करताना दिसत आहे आणि महिला घाबरलेल्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे.महिला त्याला विरोध करत आहेत. मात्र, त्याने महिलांचा विरोध न जुमानता हस्तमैथुन करण थांबवले नाही.या विकृत पुरुषाच्या चेहऱ्यावर आपण काही चुकीचं करत असल्याचा कोणताही भाव दिसत नाही. व्हायरल झालेला हा व्हिडिओ 21 सेकंदाचा आहे.दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी  याची दखल घेतली आहे.आम्ही आरोपीचा तपास करत असून लवकरच त्याला अटक  केली जाईल, आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करु असे आश्वासन रेल्वे पोलिसांनी दिले आहे.