शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (19:09 IST)

धक्कादायक ! नराधम मामानेच चिमुकल्या भाचीवर बलात्कार केला

उल्हासनगर मध्ये एका नरधमी मामाने नात्याला काळिमा लावत आपल्या 6 वर्षाच्या चिमुकल्या भाचीवर  बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे मामा भाचीच्या नात्याला गालबोट लागले आहे.या घटनेची मुलीच्या आईवडिलांनी उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.पोलिसांनी तक्रार नोंदवून मामाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.आणि नराधम मामा ला अटक केली आहे. 
 
मुंबईतील उल्हासनगर पूर्व येथे ही चिमुकली आपल्या आईवडिलांसह राहते.मुलीची आई भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करते तर मुलीचे वडील कामावर जातात.या मुलीचे आजीआजोबा आणि मामा त्यांच्या घराजवळच राहत असे.मुलीला दररोज प्रमाणे आईने आपल्या आई कडे माहेरी सोडले.ही चिमुकली दररोज आपल्या आजी आजोबांकडे खेळायला जात असे.बऱ्याच दिवसापासून या नरधमीमामाची आपल्या लहानग्या भाचीवर वाईट नजर असे.अखेर त्या नराधमाने आपल्या मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासत चिमुकलीवर बलात्कार केला.

मुली ने घरी येऊन आपल्यासोबत काहीतरी वाईट घडल्याचे आईला सांगितले.त्यांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीच्या संदर्भात तक्रार केली.पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.आरोपीची कसून चौकशी करता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.न्यायालयाने आरोपीला 18 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.