शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (14:20 IST)

फेरीवाला असा बनला 10 कोटींचा मालक

नाव संतोष कुमार उर्फ बबलू. 2005 मध्ये मुंबईत पोटापाण्यासाठी आला होता. आता एकट्या मुंबईतच त्याच्या 10 हून अधिक प्रॉपर्टी आहेत. इमारतीसोबत अनेक चाळींमध्ये त्याची घरं आहेत.
 
हा साधा फेरीवाला करोडपती कसा झाला? अशा प्रश्न सर्वांनच्या मनता येत असेलच. यामागील कारण म्हणजे रॅकेट. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत फेरिवाल्याचं संघटीत गुन्हेगारीचं रॅकेट समोर आलं आहे. 
 
संतोष कुमार आपल्या गावाहून 2005 मध्ये मुंबईत मोलमजुरी करून पोट भरण्यासाठी आला होता. सुरुवातीच्या काळात तो रेल्वे स्टेशन वर दाढी करण्याचे सामान विकायचा. यानंतर हळूहळू स्थाईक झाल्यावर त्यांची स्थानिक गुन्हेगारांसोबत ओळख झाली. संतोष स्थानिक गुन्हेगारांना दारू पाजून आपलं रॅकेट चालवायचा. 
 
स्थानिक फेरीवाल्यांकडून सुरक्षा देण्याच्या नावाखाली धमकवायचा आणि दिवसाला 500 ते 4 हजारापर्यंत हप्ता वसूल करायचा. काही काळातच तो लाखो रुपये कमवू लागला. यानंतर गावी जाण्यासाठी तो विमानाने जायला लागला. 
 
2008 मध्ये खंडणी, दरोडा, हत्येचा प्रयत्न यात त्याला अटक झाली होती. यामध्ये तो आठ महिने जेलमध्ये होता पण आता पोलिसांनी संतोष याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. नाकाबंदी करत असताना त्याला वेस्टन एक्सप्रेस हायवे वर पोलिसांनी फिल्मी स्टाइल अटक केली आहे. 
 
ब्लेड विकतानाच संतोषने एक टोळी तयार करुन सीएसएमटी ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यानं आपल्या टोळीच्या माध्यमातून रॅकेट चालंवलं. ही टोळी स्टेशन आणि गाड्यांमधल्या फेरिवाल्यांकडून खंडणी उकळत असे.
 
500 रुपयांपासून ते 5 हजारांपर्यंत खंडणी घेतली जात असे. पैसे दिले नाहीत, तर संतोष आणि त्याचे गुंड मारहाण करायचे. या खंडणीखोरीतून त्यानं तब्बल 10 कोटींची मालमत्ता जमवली.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष कुमारने नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी सुलतानपूर मध्ये कोट्यावधी रुपयांची मायाजाळ जमवली आहे. या संतोष कुमारची फक्त मुंबईत कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. इमारती सोबतच अनेक चाळींमद्धे मध्ये त्याचे घर आहे. तुर्भे, दादर, परळ व कल्याण सारखे परिसरात संतोष कुमार ने त्याच्या आणि पत्नीच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत. आजच्या बाजारभावानुसार या जमिनींची किंमत 10 कोटींपेक्षा अधिक आहे.
 
पोलिसांनी संतोषसह त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्याची बेनामी मालमत्ताही जप्त केली आहे. यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आपली बायको शिकवण्या करते, आपला गारमेंटचा व्यवसाय आहे अशी बतावणी संतोष करत होता.
 
मीडिया रिपोर्टनुसार, संतोष कुमार व त्याच्या पत्नीने अनेक चाळींमद्धे मध्ये घर घेतली आहे आणि नजीकच्या कालावधीत आता त्याचं पुनर्निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. चाळीच्या माध्यमातून पक्की घर घेऊन त्यात गुंतवणूक करायची असा याचा धंदा होता. यातून हे बक्कळ नफा मिळत होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली.