1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (14:34 IST)

नवी नवरी दागिने-रोकड घेऊन फरार

cash gold
लग्नाच्या तीन दिवसांत नवी नवरी दागिने आणि रोकड घेऊन लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार मालाड मध्ये घडला असून आरोपी नवरी आणि तिच्या मावशीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
मालाडच्या एका कुटुंबाचे हॉस्पिटल असून कुटुंबीय आपल्या 28 वर्षाच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधात होते. या मुलाला अपंगत्व असल्यामुळे लग्नासाठी मुलगी होकार देईना. त्याच्या कुटुंबीयांनी लग्न जुळवण्यासाठी एजन्टकडे गेले. त्याचे नाव कमलेश कदम असे होते. त्याने मुलासाठी अशा गिंक्वाड नावाच्या मुलीचे एक स्थळ सुचविले. मुलगी अनाथ  असून तिचे संगोपन तिच्या मावशीने मनीषा कश्यप केल्याचे एजन्ट कदम याने सांगितले . लग्नाला दोन्ही पक्षाकडून संमती मिळाल्यावर कदम यांनी फिर्यादी कडून 10  हजार रुपयांची मागणी केली. 

मुलाकडील लोकांनी होणाऱ्या नववधूला लग्नाच्या पूर्वीच दागिने घातले होते. त्यांचे लग्न 29मार्च रोजी मंदिरात झाले. एजंट कदम यांनी लग्नाची नोंद करण्यास सांगितले. मुलाकडे लोक लग्नाची निवदानी करण्यासाठी न्यायालयात गेले असता मुलीच्या मावशीने त्यांच्याकडून सही करून घेण्यासाठी दीड लाख रुपयांची गाणी केली. मुलाकडे लोकांनी तिला पिसे दिले.नंतर नवरी आशा सासरी जाऊन राहिली. तिने दागिने अंगावरच घालून होती. नंतर ती म्हणाली की मी बाजारात जाऊन येते. आणि घराबाहेर पडली. बऱ्याच वेळ झाल्यावर ती परतली नाही.

मुलाच्या वडिलांनी तिला फोन केला असता तो बंद होता. नंतर त्यांनी एजेंट कदम आणि  मुलीच्या मावशी मनीषा कश्यप यांना देखील फोन लावला पण फोन बंद होता. नंतर सासऱ्याने  आपल्या पत्नीच्या फोनवरून फोन केला असता अशाने फोन घेतला आणि मी विवाहित न मला दोन मुलं  आहे मला पैशाची गरज असल्याने मी कदम आणि मनीषा काश्यपच्या सांगण्यावरून लग्नास होकार देण्याची कबुली केली. 

या फसवणुकीची तक्रार फिर्यादी मुलाकडे लोकांनी मालाड पोलीस ठाण्यात दिली आहे. मालाड ओलीसांनी एजन्ट कदम आणि अशा गायकवाड आणि  मनीषा कश्यपच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून हा फसवणूक टोळीचा भाग सल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.