शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हजारहून अधिक महिलांना फोनवर सतावणारा विकृत अटकेत

नवी दिल्ली- फोनवर अश्लील संभाषण किंवा मेसेज पाठवून एक हजारहून अधिक महिलांना सतावणार्‍या विकृत व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद खालिद नावाचा हा व्यक्ती महिलांना वेग वेगळ्या सिम कार्डने फोन करून अश्लील संभाषण करायचा, मेसेजेस पाठवायचा, अश्लील क्लिप्सही पाठवायचा. नंतर तो आपला नंबर बदलून घेयचा.
 
मा‍त्र एक तक्रार नोंदवली गेली आणि तो पकडमध्ये आला. मोहम्मदच्या फोनमध्ये 2000 महिलांचे नंबर सेव्ह होते. दररोज खालिद 25 ते 30 महिलांना फोनवरून छळायचा. या महिलांना त्यांचे नंबर आणि फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकीही द्यायचा. लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.