शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (20:33 IST)

भारत गौरव रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा

vande bharat express
पुणे  : चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमधील 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या सर्व 40 प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी आहे की, चेन्नईहून पुण्याकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रेतील प्रवाशांनी साडेनऊ वाजता रेल्वेतील जेवण केल्यानंतर त्यांना विषबाधा झाल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. मध्यरात्री ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचली.
 
त्यावेळी तातडीने ससून रुग्णालयातील स्टाफ आणि डॉक्टर रेल्वे स्टेशनवर उपचारासाठी दाखल झाले. 40 प्रवाशांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर प्रवाशांची प्रकृती स्थिर झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही, अशी माहिती मिळाली आहे. या सर्व 40 प्रवाशांची प्रकृती आता स्थिर आहे.