रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (18:07 IST)

दिल्लीत बलात्कारानंतर 9 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळले, चौघांना अटक

दिल्लीतून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली कॅंट पोलीस स्टेशन परिसरातील ओल्ड नांगलमध्ये एका 9 वर्षीय मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या प्रकरणात असा आरोप करण्यात आला आहे की, निर्दोष मुलीवर स्मशानभूमीच्या आत बलात्कार केल्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आले. स्मशानभूमीचे पंडित आणि इतर तीन लोकांवर मुलीवर हा गुन्हा केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी नातेवाईकांना माहिती न देता निष्काळजीपणे मृत्यू, पुरावे नष्ट करणे आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता. परंतु सोमवारी सायंकाळी एससी-एसटी आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर पोलिसांनी सामूहिक बलात्कार, हत्या, पॉक्सो, एससी-एसटी कायदा आणि जीवे मारण्याची धमकी यासह इतर अनेक कलमे जोडली आहेत.
 
नातेवाईकांचा आरोप
तिच्या आई -वडिलांच्या संमतीशिवाय स्मशानभूमीत त्यांच्या मुलाचा मृतदेह जाळल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. स्मशानभूमीचे पंडित आणि तिथे काम करणाऱ्या दोन-तीन लोकांवर हा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत गावातील शेकडो लोकांनी निदर्शनेही केली. यावेळी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.