बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (10:12 IST)

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली

समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची सोशल मीडियावरून जाहीर माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल मी जास्तच बोललो. त्याबद्दल  माझ्या मनात पश्चातापाची भावना आहे. मला खंत वाटत आहे, अशा शब्‍दात त्‍यांनी माफी मागितली आहे. यासंबंधीचा व्‍हिडिओ देखील समोर आला आहे. 
 
माझ्या वडिलांचा स्मृतीदिन आहे, मला अमिताभ बच्चन यांचा मेसेज आला. आयुष्याच्या या टप्प्यावर, जगण्यासाठी माझा संघर्ष सुरू असताना, अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल मी जास्तच बोलून गेलो, त्याबद्दल मला खंत वाटते आहे, असे अमरसिंह यांनी टि्वटरवरील संदेशात म्‍हटले आहे. 
 
२०१७ साली अमर सिंह यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होते की, मी अमिताभ बच्चन यांना भेटण्याआधी ते आणि जया बच्चन स्वतंत्र राहत होते. एक प्रतिक्षा बंगल्यावर तर एक जनक बंगल्यावर राहत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.