मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 21 जून 2021 (18:40 IST)

अमरनाथ यात्रा रद्द, भाविकांना सलग दुसर्‍या वर्षी बाबा बर्फानी दिसणार नाहीत

कोरोनाच्या संकटामुळे भाविकांना सलग दुसर्‍या वर्षी बाबा बर्फानी दिसणार नाहीत.अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.यापूर्वी 2020 मध्येही अमरनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द झाली होती. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, अमरनाथ यात्रा रद्द करण्याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, जनतेचे प्राण वाचविणे महत्वाचे आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
 

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यपालांनी ट्वीट केले की, 'कोरोना संकटामुळे श्री अमरनाथजींची यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या सदस्यांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी प्रवास केवळ प्रतीकात्मक असेल.तथापि, सर्व धार्मिक विधी अमरनाथ गुहेत आयोजित केल्या जातील, ज्या इथल्या परंपरा आहे. लोकांचे प्राण वाचवणे महत्वाचे आहे, असे राज्यपाल म्हणाले. त्यामुळे लोकांच्या हिताच्या दृष्टीने यात्रा पुन्हा एकदा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.