शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (13:44 IST)

फ्लाईटमध्ये महिलेने मुलाला जन्म दिला, इंडिगोने ही खास भेट दिली

दिल्ली ते बेंगळुरूला इंडिगो विमानात एका महिलेने मुलाला जन्म दिला आहे. इंडिगोच्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की आई व मूल दोघेही निरोगी आहेत आणि विमान बंगळुरू विमानतळावर सायंकाळी 7:40 वाजता दाखल झाले.
 
निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की आम्ही पुष्टी करतो की एक प्रीमैच्योर मुलाचा जन्म दिल्लीहून बंगळुरूला उड्डाण करणारी फ्लाईट 6E 122 मध्ये झाला. पुढील तपशील उपलब्ध नाही. डिलीवरीदरम्यान फ्लाईटचे उड्डाण सामान्य होते.
 
दिल्ली-बेंगळुरू उड्डाण क्रमांक 6E 122 च्या वाटेवर या महिलेने मुलाला जन्म दिला. बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता हे विमान बेंगळुरू विमानतळावर उतरले. बंगळुरू विमानतळावर विमान उड्डाण होताच त्या महिलेचे व मुलाचे जोरदार स्वागत झाले.
 
प्राप्त माहितीनुसार इंडिगो एअरलाइन्सने फ्लाईटमध्ये जन्मलेल्या मुलाला एक खास भेट दिली आहे. आता हे मूल आयुष्यभर विनामूल्य हवाई प्रवास करण्यास सक्षम असेल.