गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राजस्थानमध्ये तृतीय पंथीयांना सरकारी नोकरीचे दरवाजे खुले

राजस्थान उच्च न्यायालयानं तृतीय पंथीयांच्या बाजूनं निर्णय देत त्यांच्यासाठी सरकारी नोकरीचे दरवाजे खुले केले आहेत. जालोर जिल्ह्यातील तृतीय पंथीय गंगा कुमारी हिने न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं राजस्थान पोलिसांना गंगा कुमारीला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
 
एखाद्या तृतीय पंथीयाला सरकारी नोकरी देणारा राजस्थानातील हा पहिला प्रकार आहे, तर देशातील हे तिसरं प्रकरण आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजस्थान पोलीस विभाग पोलीस कॉन्स्टेबल या पदावर पहिल्यांदाच तृतीय पंथीयाची नियुक्ती करणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता यांनी सुनावणीदरम्यान गंगा कुमारीला सहा आठवड्यांच्या आत कामावर रुजू करण्यासोबतच तिला 2015पासून राष्ट्रीय लाभ देण्याचाही निर्णय दिला आहे.