गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :मुंबई , बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (11:36 IST)

सायबर हल्ले, अस्थिर हवामान भारतासाठी मोठा धोका

मोठ्या  प्रमाणात होणारे सायबर हल्ले, डाटा चोरी आणि अस्थिर हवामान भारतासाठी टॉप तीन मोठे धोके आहे. असा दावा विमा ब्रोकिंग आणि रिस्क जोखीम व्यवस्थापन संस्था, मार्श यांनी आपल्या अध्यनात केला आहे.
 
सर्व्हेमध्ये 88 टक्के लोकांनी सायबर हल्ल्याला सर्वात मोठा धोका मानला आहे, डाटा चोरी (85 टक्के), अस्थिर हवामान (84 टक्के), प्रमुख आर्थिक अपयश (81 टक्के) भारतासाठी इतर मोठे धोके आहे.
 
'मार्श रिम्स - भारतात रिस्क मॅनेजमेंटची स्थिती' नावाने रिपोर्टमध्ये कॉर्पोरेट इंडियात व्यवस्थापन कार्यपद्धतीची परिपक्वतेवर प्रकाश टाकला आहे. इतर प्रमुख जोखिमांमध्ये अर्थव्यवस्था (80%), जल संकट (76%), महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांची कमतरता (76%), शहरी नियोजनाचे अपयश (72%), सरकारी अपयश (72%) सामील आहे.
 
ही रिपोर्ट सप्टेंबर 2018मध्ये मार्श आणि रिम्स द्वारे 19 उद्योगांच्या प्रमुख फर्मशी निगडित 123 सी सूइट्स, एक्जीक्यूटिव्स आणि रिस्क प्रोफेशनल्स यांच्या उत्तरांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. यात MMC आणि रिम्सच्या विशेषज्ञांचे इनपुट देखील सामील आहे.