डायनासोरसारख्या प्राण्याचा सांगाडा सापडला
नैनीतालपासून सुमारे 110 किमी अंतरावर असणाऱ्या जसपूर या छोट्याश्या शहरात एक डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडला आहे. शहराच्या फैज-ए-आम मार्गावरील विद्युत उपकेंद्रावरील भवन 35 वर्ष जून आहे. त्या ठिकाणी बीलिंग काऊंटर बनविण्यासाठी रविवारी त्या भवनाची साफसफाई सुरू असताना विभागीय कर्मचाऱ्यांना हा सांगाडा आढळून आला.
सापडलेल्या प्राण्याच्या सांगाड्याची लांबी दोन फूट तर उंची एक फूट आहे. प्राण्याचा हा सांगाडा हुबेहूब डायनासोर सारखा दिसतो. पोलिसांनी हा सांगाडा ताब्यात घेतला असून पुढे वन अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची शरीर रचना असलेले जीव उत्तराखंडाच्या जंगलात कधीही पाहिले गेलेले नाहीत.आता पोलिसांना याबद्दल सांगितलं असून आम्ही पुरातत्व विभागालाही याबद्दलची माहिती दिली.