रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (16:38 IST)

कुत्रा चावल्यावर रेबीज ऐवजी कोरोनाची लस दिली

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची एक घटना झारखंडमधून समोर आली आहे, ज्याबद्दल सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. येथे पलामू जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्‍यांनी घोर निष्काळजीपणा केला आहे. येथील नौडीहा गावातील एका व्यक्तीला कुत्रा चावला. यानंतर ते पाटण ब्लॉक मुख्यालय आरोग्य केंद्रात अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी आले. पण आरोग्य कर्मचाऱ्याने चुकून त्याला अँटी रेबीज ऐवजी कोरोनाची लस देऊन चालता केले.
 
50 वर्षीय राजूला आधीच कोरोनाच्या दोन्ही लसी मिळाल्याचे वृत्त आहे. असे असतानाही आरोग्य कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे त्यांना पुन्हा कोरोनाची लस देण्यात आली आहे. मात्र, ते अँटी रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी आले होते.
 
सध्या हे प्रकरण निष्काळजीपणाचे मानले जात असून तपासासाठी ३ सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तपासासाठी पाटणला जाणार आहे. तपासणी अहवाल आल्यानंतरच संबंधित आरोग्य सेविकेवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. मात्र, रुग्णाची प्रकृती अजूनही सामान्य आहे.