शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जून 2020 (09:57 IST)

राज्यसभेच्या १८ जागांवर १९ जून ला मतदान

राज्यसभेच्या १८ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. राज्यसभेच्या १८ जागांवर १९ जून रोजी मतदान होणार आहे. कोरोना संकटामुळे २६ मार्च रोजी होणारी राज्यसभा निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. निवडणूक पुढे ढकलण्याच्या सूचना विविध राजकीय पक्षांच्या वतीने निवडणूक आयोगास करण्यात आल्या होत्या.
 
राज्यसभेच्या १८ जागांपैकी गुजरात आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी चार, राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी तीन, झारखंडमधील दोन आणि मणिपूर आणि मेघालयातील प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे.