सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (22:58 IST)

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 2 ठार, 25 जखमी

dhaka sfot
शिवपुरी जिल्ह्यातील बदरवास येथील निवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी स्फोट झाला. या अपघातात सुमारे 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.तर या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. सध्या एकामागून एक जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना शिवपुरी आणि गुना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी बहुतांश एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार, जिल्हाधिकारी, एसपी घटनास्थळी पोहोचले.
 
बदरवास पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश शर्मा यांनी दोघांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, घटनास्थळावरून दोन मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले, तर इतर चार जण गंभीररीत्या होरपळले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीमुळे कुटुंबातील 25 जण जळून खाक झाले असून त्यापैकी 19 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.