सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पाकिस्तानचं खोटं समोर आलं, विमान पाडल्याच्या दावा नाकारला

भारत आणि पाकिस्तानात ताण सुरू असताना सोशल मीडियावर देखील युद्ध सुरू आहे. या दरम्यान पाकिस्तानकडून त्यांच्या हवाई दलांनी भारताचे दोन लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला. भारताच्या संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी तो दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, पाकिस्तानने देखील स्वीकारले की त्याने भारताचे कुठलेही विमान पाडले नाहीत. 
 
या अफवांप्रमाणे पाकिस्तान सैन्याने बुधवारी भारतीय हवाई दलाचे विमान पाडल्याचा दावा करत यातील एक विमान पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत आणि दुसरे विमान भारताच्या हद्दीत कोसळले असे म्हटले होते. या दाव्यात तथ्य नसल्याचे भारताकडून तर स्पष्ट झालेच होते दरम्यान पाकिस्तानने देखील स्वीकार केल्यानंतर स्थिती स्पष्ट झाली आहे. दरम्यान फेक फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल केले जात होते. 
 
दुसरीकडे सरकारने पाकिस्तानी उच्च आयोगाची सुरक्षा वाढवली आहे. उल्लेखनीय आहे की सोशल मीडियावर एका भारतीय विमानाचा अपघाताचा फोटो अपलोड करण्यात आला होता जो पूर्णपणे फेक होता. काही लोकांना प्रत्यक्ष घटनांसंबंधी फोटो शेअर केले ज्यामुळे पाक समर्थकांचे दावे खोटे ठरले.