बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

'या' स्टेडियमला मिळाले जेटली यांचे नाव

दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए)ने प्रसिद्ध फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांचे नुकतेच निधन झाले. जेटली यांनी डीडीसीएचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष म्हणून काम पाहीले होते.
 
स्टेडियमचे नाव बदलण्याचा कार्यक्रम पुढच्या महीन्यातील १२ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. यावेळी गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडामंत्री किरण रिजिजू हे ही सहभागी होणार असल्याची अशी माहिती ‘डीडीसीए’ने ट्वीटरवर दिली आहे.
 
भाजप खासदार आणि भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही दिल्लीतील यमुना क्रीडा संकुलाचे नाव बदलून त्यास दिवंगत अरुण जेटली यांचे नाव देण्याची मागणी केली होती.