मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (11:55 IST)

गाझीपूर: मुलाचा अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या वडिलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये मुलाच्या हत्येच्या दु:खाने पित्याचा स्मशानभूमीत मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. 18 ऑक्टोबरच्या संध्याकाळी कोतवाली परिसरात एका व्यक्तीची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. यानंतर कुटुंबीयांनी तरुणाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला, तिथेच मृताच्या वडिलांचाही मृत्यू झाला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नई बस्ती परिसरात जय मंगल राजभर यांचा मुलगा संजय राजभर याचा खून झाला होता संजय राजभरच्या वडिलांनी त्याच परिसरातील तेजूविरुद्ध घरात घुसून मुलाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.संजय यांचे पार्थिव गाझीपूर येथील स्मशानभूमीत नेण्यात आले. जिथे वडील जय मंगल राजभर मुलगा संजयचा पार्थिव पाहून बेशुद्ध पडले. त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात .नेले असता, रात्री 8 वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पिता-पुत्राच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 
 
17 ऑक्टोबरच्या संध्याकाळी कोतवाली परिसरात भरत मानवन रामलीलाच्या कार्यक्रमात काही अल्पवयीन मुलांमध्ये वाद आणि भांडण झाले. यादरम्यान सकलेनाबाद येथील तेजू बिंद यांचा मुलगा प्रद्युम्न बिंद हा जखमी झाला.  तेजू बिंद यांनी संजय राजभर यांच्या मुलाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.  

यानंतर 18 ऑक्टोबर रोजी तेजू आणि इतरांनी मुलाचा शोध घेण्यासाठी संजयच्या घरी पोहोचले. यादरम्यान त्याने घरच्यांना शिवीगाळ करून धमकावले. यानंतर सायंकाळी तेजू हा संजयच्या घरात घुसला आणि संजयने राजभर यांच्या डोक्यात  वार करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून घरातील इतर सदस्य धावले. यावेळी तेजूने घटनास्थळावरून पळ काढला. 

संजय राजभर यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी संजयला मृत घोषित केले यानंतर माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. घटनेनंतर तेजूचे संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून फरार झाले आहे.

कुटुंबीयांनी संजय राजभर यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेला. तेथे संजयचे वडील जयमंगल राजभर हे आपल्या मुलाचा पार्थिव पाहून बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. यानंतर लोकांनी त्यांना तेथून तात्काळ रुग्णालयात नेलेअसता डॉक्टरांनी त्यांना मृत केले. 
 
मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर वडिलांवरही तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर वातावरण शोकाकुल झाले आहे. घटनास्थळी शांतता राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपींच्या शोधात छापेमारी करत आहेत, मात्र अद्यापपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. 
 
 



Edited by - Priya Dixit