रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (17:23 IST)

बालकांच्या मृत्यूचे कारण काय ? हायकोर्टाचा सवाल

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील सरकारी रुग्णालयात प्राणवायूअभावी ७२ बालकांचा मृत्यू झाला. याबाबत विरोधकांकडून टीका सुरु असतानाच अलाहाबादमधील हायकोर्टानेही राज्य सरकारला जाब विचारला आहे. गोरखपूर रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूचे कारण काय असा प्रश्न हायकोर्टाने सरकारला विचारला आहे.

गोरखपूरमध्ये बाबा राघव दास रूग्णालयात गेल्या आठवड्यात प्राणवायूचा पुरेसा पुरवठा नसल्याने ७२ बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात अलाहाबाद हायकोर्टात याचिका झाली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने सरकारला प्रश्न विचारला. मृत्यूचे कारण काय असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. याप्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्य सरकारला याप्रकरणावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.