बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (12:54 IST)

Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापीबाबत आज येणार निर्णय, वाराणसीत कलम-144 लागू; सर्वत्र फौजफाटा तैनात

ज्ञानवापी-श्रृंगार गौरी वाद सुनावणीस योग्य आहे की नाही, यावर आज वाराणसी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाराणसीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी कालच जिल्ह्यात कलम 144 लागू केले होते. आज सकाळपासून वाराणसीच्या कानाकोपऱ्यात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्णा यांनी २४ ऑगस्ट रोजी निकाल राखून ठेवला होता.

आज म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी निकाल देण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयाबाबत वाराणसी पोलीस प्रशासन सतर्क आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण शहराची विभागणी करण्यात आली आहे.