गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

वाँटेड यादीत हनीप्रीत टॉप वर

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरूमित राम रहिमला 25 ऑगस्ट रोजी बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. यानंतर हरियाणातील पंचकुला आणि सिरसामध्ये प्रचंड हिंसाचार उसळला.
 
या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या 43 मोस्ट वॉटषंड गुन्हेगारांची यादी हरियाणा पो‍लिसांनी जाहीर केली आहे. यामध्ये राम ‍रहिमची दत्तक मुलगी हनीप्रीत आणि डेराचा प्रवक्ता आदित्य इन्सान या दोघांची नावे अग्रक्रमावर आहेत.
 
डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी 25 ऑगस्टला हिंसाचार माजवला त्या 38 जणांचा मृत्यू झाला. तसेच 50 पेक्षा जास्त पोलिसही जखमी झाले. त्या दिवसापासून हनीप्रीत फरार आहे. तिला आणि डेरा सच्चा सौदाच्या इतर फरार अनुयायांना शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.