गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (11:26 IST)

लॉकडाउनमध्ये बायको माहेरुन आली नाही म्हणून नवर्‍याने थाटलं दुसरं लग्न

देशभरात लॉकडाउन असल्यामुळे कोणीलाही घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसल्यामुळे अनेक लोकं जेथे होते तेथेच अडकून पडले आहेत. परंतू अशा परिस्थितीचा वेगळ्याने फायदा घेणारे विचित्र लोक देखील कमी नाही. अशाच एका विचित्र घटनेत बायको माहेरी अडकली म्हणून एका व्यक्तीनं रागाच्या भरात आपल्या प्रेयसीसोबत संसार थाटला.
 
ही घटना बिहारमच्या पाटणा येथील असून धीरज कुमार नावाच्या व्यक्तीची पत्नी आपल्या माहेरी गेली होती. परंतु देशात लॉकडाउनचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि त्यामुळे तिला परत येता आले नाही. तिने अशात नियमभंग न करता माहेरी राहण्याचा निर्णय घेतला परंतू या दरम्यान तिच्या पतीनं ती घरी येत नसल्यानं रागाच्या भरात आपल्या प्रेयसीशी दुसरं लग्न केलं.
 
लॉकडाउ असल्यावरही पती वारंवार पत्नीला घरी येण्यास सांगत होता परंतू ‍तिने नियम मोडून घरी येण्यास नकार दिला. त्यामुळे पतीचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या आपल्या प्रेयशीसी लग्न केलं. ही गोष्ट पत्नीच्या कानावर आल्यावर तिने पोलीस ठाणं गाठलं आणि आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी नवर्‍याला ताब्यात घेतलं आहे.