गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (13:37 IST)

महाराष्ट्रात भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये,अमित शहा यांनी ठाकरे यांना मदत करण्याचे आश्वासन दिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगड,महाराष्ट्रात दरड कोसळल्यामुळे प्राण गमावलेल्या लकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदतनिधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली.याशिवाय जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
 
त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली, त्यात कमीतकमी 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
अमित शहा म्हणाले की, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे. त्यांनी ट्वीट केले की, "मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील रायगडमधील झालेले अपघातअतिशय दुःखद आहे.या संदर्भात,मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (एनडीआरएफ) मुख्यालयाचे महासंचालक (डीजी) यांच्याशी बोललो आहे.एनडीआरएफची टीम मदत व बचाव कार्यात व्यस्त आहे. केंद्र सरकार लोकांचे प्राण वाचवण्यासाठी शक्य ती मदत करत आहे.
 
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील गावाजवळ भूस्खलनात कमीतकमी 30 लोक ठार झाले आहेत,अशी माहिती पोलिसांनी दिली.ते म्हणाले की, महाड तहसीलच्या तलाई गावाजवळ झालेल्या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.