गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (22:17 IST)

मोदी सरकारने मागील ७ वर्षांत फक्त सत्ता एन्जॉय करुन लोकांना बरबाद केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. यावर  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन काहीच फरक पडणार नाही असा टोला लगावला आहे. तर मोदी सरकारने मागील ७ वर्षांत फक्त सत्ता एन्जॉय करुन लोकांना बरबाद केला असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठी फेरबदल सुरु असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
 
केंद्रातील मोदी सरकारने केवळ मागील ७ वर्ष सत्ता एन्जॉय केली आहे. सत्तेचा उपभोग करत लोकांना बरबाद करण्यात येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करा किंवा करुन नका त्याने काही फरक पडत नाही. मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांकडे फाईलही जात नसल्याचे स्वतः मंत्र्यांनी सांगितले आहे. देशाचा सर्व कारभार पीएमओ चालवत आहेत. लोकतंत्र संपलं आहे त्यामुळे फेरबदल करुन पाप धुवून काढता येणार नाही अशी खोचक टीका नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.
 
मोदींच्या राज्यात देशातील नागरिकांचे जगणं मुश्किल झालं आहे. देशाच्या जनतेसोबत काँग्रेस कायम उभी होती. सरकार लोकासाठी असते केवळ नफा कमवण्यासाठी नसतं हे त्यावेळी काँग्रेसनं दाखवून दिले होते. मोदींची सत्ता देशात आल्यापासून महागाई वाढवली आहे. उज्ज्वल योजनेतून लोकांच्या घरोघरी गॅस पोहोचवला परंतु आता महागाई वाढवल्यामुळे गॅस मिळत नाही. रॉकेलही बंद केलं असल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. गॅस सबसिडी मोदी सरकारने काढून टाकली आहे यामुळे काँग्रेस राज्यभरात सायकल मार्च काढणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.