बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

270 कोटी रुपयांच्या उपग्रहाचा संपर्क तुटला

देशातील आजरवरच्या सर्वात मोठ्या स्वदेशी बनावटीच्या जीसॅट- 6 ए या दळवळण उपग्रहाचा संपर्क तुटला आहे. गुरुवारी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. या उपग्रहाच्या बांधणसाठी 270 कोटी रुपये खर्च झाले होते.
 
हे उपग्रह 10 वर्षांपर्यंत सेवा देईल, असे इस्त्रोने स्पष्ट केले होते. या उपग्रहामुळे सॅटेलाइट आधारित मोबाईल कॉलिंग आणि कम्युनिकेशन सेवा अधिक प्रभावी होणार होती. तसेच यामुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होणार होते. जीसॅट 6 ए या उपग्रहाकडे सर्वात मोठा अँटेना असून इस्त्रोनेच त्याची निर्मिती केली होती.
 
सर्वसामान्यांच्या दृष्टीने आणि भारतीय सैन्याच्या दृष्टीने हे उपग्रह अत्यंत महत्त्वाचे ठरणार होते. इस्त्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेला हादरा बसला. पॉवर सिस्टममधील बिघाडामुळे ही नामुष्की ओढावल्याचे समजते. उपग्रहाशी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे.