बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (10:04 IST)

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी सोशल मीडियावर या कृतीमुळे चर्चेत

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यांच्या एक कृतीमुळे ते सोशल मीडियावर ते जोरदार चर्चेत आहेत. कुमारस्वामी सध्या 'व्हिलेज स्टे प्रोग्राम'अंतर्गत राज्यातील गावांचा दौरा करत असून, शुक्रवारी ते कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील हेरुर गावात दाखल झाले. या भागात मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कार्यक्रम स्थगीत करावा लागला. या स्थितीत मुख्यमंत्र्यांना चंदकी गावातील यादगीर सरकारी शाळेत थांबावण्यात आले, यावेळी कुमारस्वामी शाळेच्या वर्गातील फर्चीवर पांढरा रुमाल टाकून झोपी गेले होते, कुमारस्वामी यांच्या या साधेपणाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. येथील कार्यक्रमात ते म्हणाले होते की, मी गावांचा दौरा करण्यासाठी साध्या बसने प्रवास करत असून आपल्याला कुणाकडून काहीही शिकायची गरज नाही. आपण झोपडीसह पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील राहिलेलो आहोत, असही कुमारस्वामी म्हणाले आहेत.