शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 एप्रिल 2021 (16:39 IST)

अजब एमपी गजब कहाणी, प्रेमी जोडपं करत होतं रेमडेसिविर इंजेक्शनची ब्लॅक मार्केटिंग

मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्ह्यापर्यंत हेलीकॉप्टरने पाठवून राहिले आहेत तर दुसर्‍या बाजूला रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्याचं नावच घेत नाहीये. मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
 
राजधानीच्या सर्वात मोठ्या कोविड 19 रुग्णालयांपैकी एक जेके रुग्णालयात नर्सिंग स्टॉफमध्ये नर्स आणि तिच्या प्रियकार काळाबाजार करत होते. नर्स रुग्णालयात दाखल रुग्णांना रेमडेसिवीरच्या नावाने नॉर्मल इंजेक्शन देत होती आणि चोरी केलेले इंजेक्शन्स आपल्या प्रियकराला पुरवठा करुन हे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकत होती.
 
एका पीडित कुटंबाच्या तक्रारीनंतर अजब प्रेम कथेचं सत्य समोर आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की गिरधर कॉम्पलेक्स दानिशकुंज येथील रहिवासी असलेल्या झलकन सिंह याची प्रेयसी शालिनी जेके रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. आरोपीनं सांगितलं की त्याची प्रेयसी रुग्णांना रेमडेसिवीरच्या जागी नॉर्मल इंजेक्शन देत होती आणि रेमडेसिवीर इंजेक्शन स्वत:कडे ठेवून घेत होती. प्रियकर हे इंजेक्शन 20 ते 30 हजारात विकत होता. 
 
आरोपीनं सांगितलं की त्यानं जे के रुग्णालयातीलच डॉक्टर शुभम पटेरिया यांनाही हे इंजेक्शन 16 एप्रिल रोजी 13 हजार रुपयात विकलं होतं. त्याचं पेमेंट डॉक्टने ऑनलाईन केलं होतं.
 
प्रियकरला ताब्यात घेतल्याचे कळल्यावर आरोपी नर्स फरार झाली आहे.