सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जुलै 2024 (12:36 IST)

दुःखात बदलला लग्नाचा आनंद, विजेचा झटका लागल्याने महिलेचा मृत्यू

electric shock
हरियाणा मधील गुरुग्राम मध्ये लग्नाचा आनंद दुःखात बदलला आहे. एका  महिलेला विजेचा झटका लागला असून त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे तर तिला वाचवायला गेलेले दोन जण जखमी झाले आहे. मिळलेल्या माहितीनुसार भवानी एनक्लेवची गल्ली नंबर-6 मध्ये एक हाय वोल्टेज विजेच्या लाईनमध्ये एक महिला आली. यावेळी तीन जणांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण हे लोक जखमी झाले.
 
उपस्थित नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. व चिकिस्तकांनी या महिलेला मृत घोषित केले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या घरात लग्न होते. तसेच ती साफसफाई करीत होती. तिने लोखंडाचा काही सामान उचलला आणि 11 हजारची लाइन ला टच झाला. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.