गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (13:36 IST)

दिल्लीतील CBI मुख्यालयाला भीषण आग

राजधानी नवी दिल्लीमधील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या CBI मुख्यालयाला आग लागली आहे. सीबीआय मुख्यालय पार्किंग क्षेत्रात आगीची नोंद झाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
 
अचानक आग लागल्याने, सीबीआयचे सर्व अधिकारी इमारतीच्या बाहेर आले आहेत. इमारती मधून धुराचे लोटाने, अग्निशामन दल लवकरच त्याठिकाणी पोहोचले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आली असून आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रोधी रोड स्थित सीबीआय मुख्यालयात दुपारी 11.36 वाजता ही आग लागली. एसी प्लांटच्या खोलीत असलेल्या तळघरात आग लागली. अग्निशामक दलाच्या गाड्यांनी 20-30 मिनिटांत आग आटोक्यात आणली.
 
सीबीआय मुख्यालयाच्या आत पार्किंग क्षेत्रात ही आग लागल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिली आहे. पार्किंगच्या क्षेत्राबाहेर धूर येत असल्याचे पाहून अधिकारी कार्यालयाबाहेर गेले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.